मुंबई : मुस्लिम महिलांसाठी हक्काची आणि स्वाभिमानाचा मुद्दा ठरलेला 'ट्रिपल तलाक' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. याच मुद्द्यावर अभिनेता सैफ अली खाननंही आपली मतं मांडलीत.
आपण 'ट्रिपल तलाक'च्या प्रथेशी सहमत नसल्याचं स्पष्ट मत सैफनं व्यक्त केलंय. सैफनं पहिली पत्नी अमृता सिंग हिच्याशी निकाह केला होता... परंतु, 'तलाक' मात्र कायदेशीर पद्धतीनंच घेतला. करीनाशीही भारत सरकारनं केलेल्या तरतुदींनुसारच विवाह केला. 'माझ्यावर माझ्या मुलांची जबाबदारी होती. मी कधीच ट्रीपल तलाकच्या प्रथेला मानलं नाही... आणि म्हणूनच मी तलाकही यापद्धतीनं घेतला नाही' असं सैफनं म्हटलंय.
जगभरात कट्टर इस्लामविषयी वाढत्या भीतीबद्दलही सैफनं आपलं मत मांडलंय. 'मला माझ्या ओळखीमुळी कधीही अडचणींचा सामना करावा लागला नाही. परंतु, जगभरात इस्लामबद्दल जी भीती आणि तिरस्कार वाढतोय, तो चिंताजनक आहे' असंही सैफनं म्हटलंय.