नवाब खानचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेण्याची शक्यता

अभिनेता सैफ अली खानला मिळालेली ‘पद्मश्री’ पुरस्कार वादात आलीय. सरकार ही पद्मश्री परत घेण्याची शक्यताय. सैफवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळं ही पद्मश्री परत घेतली जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 7, 2014, 07:32 PM IST
नवाब खानचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेण्याची शक्यता title=

नवी दिल्ली: अभिनेता सैफ अली खानला मिळालेली ‘पद्मश्री’ पुरस्कार वादात आलीय. सरकार ही पद्मश्री परत घेण्याची शक्यताय. सैफवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळं ही पद्मश्री परत घेतली जाण्याची शक्यता आहे. 

सैफला ज्यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्याचवेळी सर्वचस्तरांतून नाराजीचा सूर उमटला होता. त्यावेळी सैफची आई अभिनेत्री शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डावर होत्या हे विशेष.

माहिती अधिकार कार्यकर्ते एस. सी. अग्रवाल यांनी मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं, की एका रेस्टॉरंटमध्ये अनिवासी भारतीयाला मारहाण करणाऱ्या सैफ विरोधात आरोप निश्चित झालेले आहेत. त्यामुळं त्याला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. 

अग्रवाल यांच्या तक्रारीवर गृह मंत्रालय विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. सैफला 2010 मध्ये मनोरंजन क्षेत्रातील योगदानामुळे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.