सलमानने तंबी दिली आणि त्यांनी व्हिडीओ हटवला

सलमान खानने तंबी दिल्यामुळेच या शोचा व्हिडीओ यू ट्यूबवरुन काढल्याचं आता समोर आलं आहे. यापूर्वी अश्लीलता आणि सर्वस्तरीय टीकेमुळे एआयबी शोचा व्हिडीओ यू ट्यूबवरुन काढण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.

Updated: Feb 5, 2015, 11:00 PM IST
 सलमानने तंबी दिली आणि त्यांनी व्हिडीओ हटवला title=

मुंबई : सलमान खानने तंबी दिल्यामुळेच या शोचा व्हिडीओ यू ट्यूबवरुन काढल्याचं आता समोर आलं आहे. यापूर्वी अश्लीलता आणि सर्वस्तरीय टीकेमुळे एआयबी शोचा व्हिडीओ यू ट्यूबवरुन काढण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.
 
एआयबी शोमध्ये सलमान खानची बहिण अर्पिताबद्दल आक्षेपार्ह विनोद करण्यात आले. त्यामुळे सल्लू भाई खूपच संतापला आणि त्याने एआयबीला व्हिडीओ काढून टाकण्यासाठी सांगितलं. त्यानंतरच एआयबीने एक पाऊल मागे घेत हा व्हिडीओ काढून टाकला असल्याचं सांगण्यात येतंय.
 
एआयबी नॉकआऊट या शोच्या माध्यमातून अश्लील आणि शिवराळ भाषेत विनोद करण्यात आले. त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी या शोला विरोध केला आणि कालच एआयबीने सर्व व्हिडीओ काढून टाकले आहेत.
 
मात्र आपण कोणाच्याही दबावाने हे व्हिडीओ काढून टाकले नाहीत, असा दावा एआयबीने यापूर्वी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.