अलौकीक कामगिरी कणाऱ्यांना झी २४ तासचा 'अनन्य सन्मान'

सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. 2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.

Updated: Feb 5, 2015, 10:45 PM IST
अलौकीक कामगिरी कणाऱ्यांना झी २४ तासचा 'अनन्य सन्मान' title=

मुंबई : सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. 2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.

प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी सेवारत असणा-या मोरेश्वर मोर्शीकर गुरूजींना शिक्षण अनन्य सन्मान, तेजराव कन्नर यांना कृषी अनन्य सन्मान, श्रीनिवास शिंदगी यांना मनोरंजन अनन्य सन्मान, सदानंद जाधव यांना क्रीडा अनन्य सन्मान, अमित पवार याला शौर्य अनन्य सन्मान, रेहाना बैलिम आणि भारती लोळगे यांना समाजसेवा अनन्य सन्मान, डॉ. विवेक भिडे यांना पर्यावरण अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं.

तर वंचित पारधी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या स्वागतपर भाषणानं सोहळ्याला सुरूवात झाली. अनन्य सन्मानचे मानकरी हेच खरे सेलिब्रिटी आहेत, अशा शब्दांत डॉ. चंद्रा यांनी सन्मान विजेत्यांचं कौतुक केलं.

ग्रुप सीईओ भास्कर दास, विनोद तावडे, रेणू दांडेकर, एस. एस. मगर, सुनील तटकरे, हर्षवर्धन पाटील, मनोज जोशी, विजय पनवेलकर, झहीर खान, चंद्रकांत पाटील, रमाकांत देवरूखकर, बाळासाहेब थोरात, अरविंद इनामदार, बाबा आढाव, सुभाष देसाई, डॉ. रामदास कुटे, रामदास कदम, सुबोध कुमार, डॉ. विवेक भिडे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.