सलमान उर्वशीला मदतीचा हात देणार का?

सलमान खानमुळे सध्या मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेचा विषय बनली आहे. 

Updated: Nov 17, 2016, 08:45 AM IST
सलमान उर्वशीला मदतीचा हात देणार का? title=

मुंबई : सलमान खानमुळे सध्या मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेचा विषय बनली आहे. सनम रे फेम उर्वशी आता दिलदार सुलतानच्या सपोर्टची वाट बघत आहे. एवढचं नाही तर उर्वशी खान फॅमिलीच्या पण जवळ जाण्याचा प्रयत्न करते आहे.

उर्वशीला ब-याचदा सलमानच्या घरी बघण्यात आलं आहे. सुलतानमध्ये याआधी उर्वशीला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र मिस युनिव्हर्स ब्युटी कॉन्टेस्टमुळे उर्वशीने हा बिग बजेट सिनेमा सोडला, आता तिच उर्वशी सलमानच्या होकाराच्या प्रतिक्षेत आहे.

सलमान आणि उर्वशीच्या अफेअरची चर्चाही सध्या बीटाऊनमध्ये रंगते आहे. त्यामुळेच आता सलमान उर्वशीलाही बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यासाठी मदतीचा हात देणार का? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.