सलमान पनवेलननंतर थेट जाणार श्रीनगरला

मुंबई हायकोर्टाने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आज मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 

Updated: May 8, 2015, 07:53 PM IST
सलमान पनवेलननंतर थेट जाणार श्रीनगरला  title=

मुंबई : मुंबई हायकोर्टाने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आज मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय शिक्षा मिळाल्याने ताण तणावात होते. आता दिलासा मिळाल्याने संपूर्ण कुटुंब आणि काही मित्र परिवार सलीम खान यांच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी जाणार आहे. 

या संदर्भातील माहिती स्वतः सलीम खान यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना दिली. दरम्यान, पनवेलला पार्टी केल्यानंतर टेन्शन फ्री झालेला सलमान आपला आगामी चित्रपट बजरंगी भाईजानच्या शुटिंगसाठी श्रीनगरला रवाना होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.