सलमाननं नाकारले हे चित्रपट झाले हिट

सलमान खाननं आपल्या बॉलीवूडच्या कारकिर्दीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Updated: Mar 6, 2016, 10:43 PM IST
सलमाननं नाकारले हे चित्रपट झाले हिट title=

मुंबई: सलमान खाननं आपल्या बॉलीवूडच्या कारकिर्दीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमान खान म्हणजे चित्रपट हिट होणारच हे तर आता समिकरण बनलं आहे. पण सलमान खाननं असे काही चित्रपट नाकारले जे नंतर ब्लॉक बस्टर ठरले. त्यामुळे हे चित्रपट नाकारल्याबद्दल सलमान पस्तावत असेल. 

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आदित्य चोप्रानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय, तर यश चोप्रा या चित्रपटाचे निर्माते होते.

या चित्रपटातलं राज मल्होत्राचं मुख्य कॅरेक्टरसाठी सलमान चोप्रांची पसंती होती, पण त्यानं नकार दिल्यामुळे हा रोल शाहरुखला देण्यात आला, आणि शाहरुखच्या कारकिर्दीतला हा सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ला 10 फिल्मफेअर अवॉर्ड आणि नॅशनल अवॉर्डही मिळालं. 

बाझीगर

1993 मध्ये रिलीज झालेला या क्राईम थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शक होते अब्बास मस्तान. अब्बास मस्तान यांना सलमानला घेऊन या चित्रपट करायचा होता. पण त्यांना शाहरुखला घेऊन हा चित्रपट करावा लागला. या चित्रपटामुळेच शाहरुखला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 

जोश

2000 साली रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि चंद्रचुड सिंग यांनी मुख्य भूमिका केली होती. सलमाननं या चित्रपटाला नकार दिल्यामुळे शाहरुखनं या चित्रपटामध्ये काम केलं. 

कल हो ना हो

'कल हो ना हो'मध्ये रोहित पटेलच्या भूमिकेसाठी सलमान ही पहिली पसंती होती, पण सलमानला शाहरुखचा सहाय्यक अभिनेता म्हणून काम करायचं नव्हतं. अखेर ही भूमिका सैफ अली खानला देण्यात आली. 

गजनी

आमिर खान, आसिन आणि जिया खान यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. या चित्रपटात सलमानला मुख्य भूमिकेत घ्यावं म्हणून आमिरनंच दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितलं होतं. पण सलमाननं नकार दिल्यामुळे अखेर आमिरनंच या चित्रपटामध्ये काम केलं. आणि सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी गजनी एक ठरला.

चक दे इंडिया

भारतीय महिला हॉकी टीम आणि त्याचा कोच यावर आधारित हा चित्रपट बनवताना सलमान खान ही पहिली पसंती होती, पण सलमानकडे या चित्रपटासाठी तारखा नसल्यामुळे शाहरुखनं हा चित्रपट केला.