बजरंगीने दिले 'बाहुबली'ला धोबीपछाड, कमाईत टाकले मागे

सुपरस्टार सलमान खान याला बॉक्स ऑफिसचा दबंग म्हटले जाते, ते त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ईदला रिलिज झालेल्या सलमानच्या 'बजरंगी भाईजान'ने दाक्षिणात्य चित्रपट बाहुबली'ला मागे टाकले आहे. 

Updated: Jul 28, 2015, 11:56 AM IST
बजरंगीने दिले 'बाहुबली'ला धोबीपछाड, कमाईत टाकले मागे title=

नवी दिल्ली : सुपरस्टार सलमान खान याला बॉक्स ऑफिसचा दबंग म्हटले जाते, ते त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ईदला रिलिज झालेल्या सलमानच्या 'बजरंगी भाईजान'ने दाक्षिणात्य चित्रपट बाहुबली'ला मागे टाकले आहे. 

झी मीडियाचे इंग्रजी वृत्तपत्र डीएनएने दिलेल्या बातमीनुसार 'बजरंगी भाईजान'ने जगभरात ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

'बजरंगी भाईजान'ची देशात एकूण २४० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तसेच देशातील बहुतांशी चित्रपट गृहात या चित्रपटाचे शो चांगले चालत आहेत. 

दुसरीकडे एसएस राजामौलीचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली'ने आतापर्यंत जगभरात ३८५ कोटींची कमाई केली आहे. यात सर्व भाषेतील चित्रपटांचा समावेश  आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन १७ दिवस झाले आहेत. 

बजरंगी भाईजान हा गेल्या आठवड्यात रिलीज होऊ त्यान बाहुबलीला मागे टाकले आहे. 

सलमान, करिना स्टार हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा पहिला चित्रपट ठरला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.