सलमानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

सलमान खानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Updated: May 31, 2016, 02:40 PM IST

मुंबई : सलमान खानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे. हे गाणं सलमान स्टाईलमध्ये आहे. या गाण्यात हरियाणवी टोन आहे, हे गाणं विशाल ददलानी, इशिता आणि शाल्मली खोलगडेने गायलंय.

कोरियोग्राफ फराह खानने केली आहे, या गाण्यात सलमान आपल्या सिग्नेचर स्टाईल मारताना दिसतोय. अनुष्का शर्माचा छान पैकी डान्स या गाण्यात पाहायला मिळतोय.