कराची : ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘किक’ हा सिनेमा पाकिस्तानमध्येही प्रदर्शित झालाय. पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा आत्तापर्यंतचे बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे.
कराचीच्या अनेक मल्टीप्लेक्समध्ये हा सिनेमा सध्या सुरू आहे. प्रसिद्ध सिनेवितरक नदीम मांडवीवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. ‘किक’चा प्रिव्ह्यू स्क्रिनिंगसाठी येणारी गर्दीही रेकॉर्डतोड ठरू शकते.
याआधी, पाकिस्तानात पहिल्या दिवशी आणि पहिल्या आठवड्यात सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड आमिर खान अभिनीत ‘धूम 3’नं केला होता. या सिनेमानं 24 करोडोंची कमाई इथं केली होती.
नदीम यांच्या म्हणण्यानुसार, ‘किक’ची कमाई यापेक्षा खूपच चांगली होऊ शकते. कारण, हा सिनेमा एका खास मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलाय. पाकिस्तानात ‘किक’ प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांनी बॉलिवूडचा ‘एन्टरटेन्मेंट’ हा सिनेमा इथं प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.