सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण!

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी 

Bollywood Life | Updated: Apr 1, 2015, 10:33 AM IST
सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण! title=

मुंबई: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी 

लैंगिक शोषण झालं होतं. हे घाणेरडं कृत्य इतर कुणी नाही तर तिच्या घरी काम करणाऱ्या नोकरानं केलं होतं.

एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेली सोमी अली पाच वर्षांची असतांना तिच्या घरातील नोकरानं तिचं लैंगिक शोषण केलं होतं. बॉलिवूडची ही माजी अभिनेत्री लैंगिक अत्याचाराला सामोरं गेल्यानंतर तिच्या देशात पाकिस्तानात जेव्हाही कोणत्या विद्यापीठात तिला आमंत्रित केलं जातं. तेव्हा विद्यार्थ्यांसोबत आपले अनुभव शेअर करते.

सोमीनं सांगितलं, तिने हे विद्यार्थ्यांना याकरता सांगितलं कारण या अशा घटनेमुळं निराश झालेले विद्यार्थी स्वत:ची लाज वाटून घेत असतात , तसं होऊ नये म्हणून आपण आपला अनुभव शेअर केला. 
यामुळं इतर लैंगिक अत्याचारग्रस्त विद्यार्थ्यांचं धैर्य वाढेल आणि आपल्यावरील अत्याचाराविरोधात ते आवाज उचलतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.