मुंबई : अभिनेता सलमान खान याने वादग्रस्त ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात तीव्र आणि संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे. तसे त्याने ट्विट केले आहे.
सलमान आगामी चित्रपट 'सुल्तान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे. एका मुलाखतीत बोलताना सलमानने केलेली हा तुलना त्याच्या चाहत्यांना रुचली नाही. सोशल मीडियावरुन सलमानवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
Just put this man in jail already. https://t.co/hOJC5jjVxe
— Tahira Sequeira (@TeeSeq) June 20, 2016
सलमानला 'सुल्तान' चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका निभावणं किती कठीण गेलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 'सहा तास सलग शूटिंग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. मला हे फारच कठीण गेलं. कारण १२० किलो वजनाच्या व्यक्तीला मला १० वेळा आणि तेदेखील १० वेगवेगळ्या अँगलने उचलावे लागायचे, असे तो म्हणाला.
तसेच मलादेखील उचलून जमिनीवर आपटलं जायचे. खऱ्या खेळात अशाप्रकारे पुनरावृत्ती केली जात नाही. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचे. रिंग बाहेर पडल्याने मला सरळ चालणे शक्य व्हायचे नाही. काहीतरी खायचो आणि ट्रेनिंगसाठी जायचो, हे सलमानचे बोलणे आणि बलात्कार पिडीत महिलेचा केलेला उल्लेख अनेकांना रुचलेला नाही.
Salman Khan compared his shooting schedule to what a "raped woman" feels like. Is that worse than Lata-Sachin jokes, Bollywood?
— Dhruv Deshpande (@DhruvDeshpunde) June 20, 2016
So Salman compares a physically demanding shoot to a woman getting raped! #beingmoron #SalmanKhan #Sultanshoot
— ananya (@ananya1281) June 20, 2016
Salman Khan Compared Himself To A “Raped Woman” Because He’s A Nationally Revered Dumbfuck. #Sultan https://t.co/5UrB1L7or8
— Fatima Tassadiq (@fatimatassadiq) June 20, 2016