चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यानं अभिनेत्रीनं को-स्टारला मारली थापड!

टीव्ही सीरिअल 'दीया और बाती हम'ची अभिनेत्री दीपिका सिंहनं आपला को-स्टार अनस रशीद म्हणजेच सूरजला पूर्ण युनिटसमोर जोरदार कानाखाली लगावली.

Updated: Mar 12, 2015, 12:31 PM IST
चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यानं अभिनेत्रीनं को-स्टारला मारली थापड! title=

मुंबई: टीव्ही सीरिअल 'दीया और बाती हम'ची अभिनेत्री दीपिका सिंहनं आपला को-स्टार अनस रशीद म्हणजेच सूरजला पूर्ण युनिटसमोर जोरदार कानाखाली लगावली.

हो हे खरंय संध्या म्हणजे दीपिकानं अनसवर आरोप लावला की त्यानं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. ज्यामुळं तिनं त्याला थापड मारली.

एका बॉलिवूड वेबसाइटवरील बातमीनुसार लैंगिक शोषणाचा विरोध करत दीपिकानं पूर्ण युनिटसमोर अनस रशीदला मारलं. रिपोर्टनुसार दोन दिवसांपूर्वी 'दीया और बाती हम'च्या एका सीनचं शूटिंग सुरू असतांना अनसला दीपिकाला मागून पकडायचं होतं. शूटिंग संपल्यानंतर दीपिकानं युनिटकडे अनसबद्दल तक्रार केली.

नंतर दुसऱ्या दिवशी दीपिकानं सेटवर अनेक जणांना सांगितलं की, अनसनं तिची छेड काढली. मात्र तिथं उपस्थित कुणीही दीपिकाच्या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही. युनीटकडून कोणतंही पाऊल उचललं जात नाही हे पाहून सीरिअलमध्ये निर्भिज महिलेची भूमिका करणाऱ्या दीपिकानं संपूर्ण युनिटसमोर अनसला जोरदार थापड मारली.

या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा अनसला विचारलं गेलं, तेव्हा त्यानं हा प्रकार खोटा असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे अनसने दीपिकाविरुद्ध सिने असोसिएशनमध्ये तक्रार केलीय. अनसच्या मते दीपिका त्याच्यावर काही इतरही आरोप लावू शकते.

सीरिअलमध्ये भाभोची भूमिका करणाऱ्या नीलू यांना जेव्हा विचारलं तेव्हा मी मेकअप रूममध्ये होती, असं सांगितलं. चार वर्षांपासून या सीरिअलमध्ये एकत्र काम करणारे दीपिका आणि अनस अनेकदा एकमेकांसोबत बोलतही नाहीत. आता तर दीपिकानं सीरिअल सोडायची धमकी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.