पुढचे सहा महिने अनुष्काचं शूटींग बंद!

बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढचे सहा महिने तरी कॅमेऱ्यासमोर येणार नाहीय.

Updated: Mar 12, 2015, 11:17 AM IST
पुढचे सहा महिने अनुष्काचं शूटींग बंद!

मुंबई : बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढचे सहा महिने तरी कॅमेऱ्यासमोर येणार नाहीय.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा 'एनएच १०' उद्या म्हणजे १३ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. यानंतर, अनुष्का करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात दिसणार आहे... आणि या सिनेमाचं शूटींग थोडं उशीराच सुरू होणार आहे. त्यामुळेच, ती फिल्म सेटसपासून दूर राहणार आहे. 

या काळात अनुष्का आपल्या आगामी सिनेमांच्या प्रमोशनातच दिसणार आहे. 'एनएच १०'च्या निमित्तानं प्रोड्युसर बनलेली अनुष्का आपल्या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. यापूर्वी, आलेल्या अनुष्काच्या 'पीके'नं तब्बल ४०० करोडोंचा गल्ला गोळा केला होता. 

'एनएच १०'नंतर एप्रिलमध्ये अनुष्काचा बॉम्बे वेलवेट आणि मेमध्ये 'दिल धडकने दो' हे दोन सिनेमे प्रेक्षकांसमोर हजर होतील. त्यामुळे, अनुष्का या सिनेमांच्या प्रचारात दिसेल. 

याशिवाय, आपण सध्या आणखीन काही कथा वाचत आहोत... पण, जेव्हापर्यंत ते सिनेमे साईन करणार नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी आपण बोलणार नसल्याचं अनुष्का म्हणतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.