पुणे : शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तच्या फर्लोवर अजुनही सस्पेन्स कायम आहे. संजय दत्तला येरवडा जेल प्रशासनानेच माघारी पाठवल्याची माहिती जेल प्रशासनाने दिलीय. फर्लोबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेला संजय दत्तची फर्लो वाढवून घेण्यासाठी खटपट सुरू आहे. कारण संजय दत्त येरवडा जेलसमोरून माघारी फिरलाय. आज फर्लोची मुदत संपत असल्यानं संजय दत्त येरवड्याला आलाय. मात्र आज रात्री उशिरापर्यंत कारागृहात हजर राहण्याची मुदत असल्यामुळं संजय दत्त माघारी फिरलाय.
संजय दत्तची फर्लो रजा वाढवून मिळालेली नाही. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांचा क्लिअरन्स रिपोर्ट अजून येरवडा कारागृहाला मिळालेला नाही. तो मुदत संपण्यापूर्वी मिळाला तर कारागृहात जाणं टाळता येऊ शकेल. आणि याच आशेवर संजय दत्त वेळ काढत असल्याचं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.