दीपिका आणि रणवीरचं होणार शुभमंगल!

दीपिका आणि रणवीर सिंहच्या फॅनसाठी एक इंटरेस्टिंग अपडेट... त्याचं लग्न आता पक्क झालं आहे. दोघांच्या घरच्यांही याला होकार दिला आहे. आता फॅन्सला त्यांच्या लग्नाच्या डेटची प्रतिक्षा आहे. 

Updated: Jan 8, 2015, 06:40 PM IST
दीपिका आणि रणवीरचं होणार शुभमंगल! title=

मुंबई : दीपिका आणि रणवीर सिंहच्या फॅनसाठी एक इंटरेस्टिंग अपडेट... त्याचं लग्न आता पक्क झालं आहे. दोघांच्या घरच्यांही याला होकार दिला आहे. आता फॅन्सला त्यांच्या लग्नाच्या डेटची प्रतिक्षा आहे. 

दीपिका पदुकोणच्या 'शादी का खयाल' तिच्या पालकांना आला आहे. त्यामुळेच रणबीरला दीपिकाच्या कुटुंबियांनी 'चायपें बुलाया था'... आता रणवीर सिंग 
आपल्या या प्रेमाला नवीन नाव देण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे त्याने दीपिकाच्या पालकांशी भेट घेतली. तेही बंगळुरू येथील दीपिकाच्या घरी जाऊन... 

या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर सिंगनेही दीपिकाच्या पालकांना एम्प्रेस केले आहे. रणवीरने दीपिकाच्या पालकांकडून तिला लग्नाची मागणी घातली होती, अशी बातमी होती. 

सुट्ट्यानंतर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी दीपिका बंगळुरू आपल्या घरी गेली होती आणि तेही रणवीर सोबत... रणवीर दीपिकासोबत बंगळुरूला गेला तो फक्त तिला लग्नाची मागणी घालण्यासाठीच... दीपिकाच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी रणवीरने काही कसर सोडली नाही. त्याने आपल्या कपड्यांपासून वागण्या-बोलण्यात त्याने खूप बदल केले. चहाबरोबर रणवीरने दीपिकाच्या आईवडिलांशी अशा गप्पा मारल्या असे इम्प्रेस केले की त्यांनी त्याला नाही म्हटले नाही. 

पाहू या याचा एक व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.