मुंबई: अभिनेत्री शिखा जोशी हिच्या आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी एका कॉस्मेटिक सर्जनला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र हा डॉक्टर पोलिसांना जबानी देण्यासाठी आज आलाच नाही.
अंधेरीला मैत्रिणीकडे राहणाऱ्या शिखा जोशी या 40 वर्षीय अभिनेत्रीनं स्वतःच्याच गळ्यावर वार करून घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूपूर्वी मैत्रिणीनं मोबाईलवरून तिची जबानी नोंदवून घेतली. त्यामध्ये शिखानं संबंधित कॉस्मेटिक सर्जन आणि काही विवाहित पुरूष आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.
त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत चार ते पाचजणांची जबानी नोंदवलीय. संबंधित डॉक्टरला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं होतं. मात्र त्या डॉक्टरनं जबानी देणं टाळलंय... त्यामुळं या प्रकरणातलं गूढ आणखी वाढलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.