मुंबई : बाहुबली सिनेमात रम्म्याने शिवगामी देवीची भूमिका पार पाडली, ही भूमिका अत्यंत प्रभावी मानली जात आहे. मात्र ही भूमिका सुरूवातीला श्रीदेवीच्या वाटेला आली होती, श्रीदेवीने शिवगामी देवीची भूमिका नाकारल्याने, ती रम्म्याला ऑफर करण्यात आली, तिने ऑफर स्वीकारली आणि एक प्रभावी शिवगामी देवी साकारली.
रम्म्याने केलेली शिवगामीची भूमिका दुसरी कोणीही इतक्या चांगल्या प्रकारे साकारू शकली नसती, असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. पण रम्म्याला ही भूमिका मिळाली ती श्रीदेवीच्या नकारामुळे. राजामौली यांनी श्रीदेवीला या भूमिकेसाठी विचारणा केली होती. पण काही कारणास्तव तसे झाले नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवीने ही भूमिका करावी अशी बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांची अगदी मनापासूनची इच्छा होती. त्यासाठी राजामौलींनी जेव्हा याबाबत श्रीदेवीकडे विचारणा केली तेव्हा श्रीदेवीनेही सकारात्मक भूमिका दाखवली. पण तिने मागितलेली फीस जास्त होती. श्रीदेवीने या चित्रपटासाठी ६ कोटी रुपयांची मागणी केली होती, असे समोर आले आहे. पण आधीच चित्रपटाचे बजेट वाढत चालले होते, त्यामुळे राजामौलींनी श्रीदेवींना भूमिका देण्याचा विचार बदलला.
श्रीदेवीच्या मागणीनंतर राजामौली आणि निर्मात्यांनी श्रीदेवीचा विचार सोडला आणि राम्याशी संपर्क केला. राम्याने अत्यंत उत्कृष्ट ऑडिशन दिले आणि शिवगामीसाठी योग्य असल्याचे सर्वांना पटले. राम्याने या चित्रपटासाठी २.५ कोटी रुपये घेतल्याचे समोर आले आहे.