VIDEO : 'प्रेग्नंट' राधिका आपटेची नवी आव्हानं

आपल्या 'बोल्ड अॅन्डी ब्युटीफूल' अदांमधून 'अहल्या' या शॉर्टमधून नुकतीच 'लय भारी' गर्ल राधिका आपटे प्रेक्षकांसमोर आली होती. आता, हीच मराठमोळी अभिनेत्री आणखीन एका नव्या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांसमोर आलीय. 

Updated: Dec 8, 2015, 02:26 PM IST
VIDEO : 'प्रेग्नंट' राधिका आपटेची नवी आव्हानं title=

मुंबई : आपल्या 'बोल्ड अॅन्डी ब्युटीफूल' अदांमधून 'अहल्या' या शॉर्टमधून नुकतीच 'लय भारी' गर्ल राधिका आपटे प्रेक्षकांसमोर आली होती. आता, हीच मराठमोळी अभिनेत्री आणखीन एका नव्या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांसमोर आलीय. 

'द कॉलिंग' या नव्या शॉर्टफिल्ममध्ये राधिका सध्या दिसतेय. यामध्ये ती एका गरोदर आणि महत्त्वकांक्षी महिलेच्या भूमिकेत दिसतेय.

VIDEO : मॉडर्न 'अहल्या'च्या भूमिकेत राधिका आपटे!

आजच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या एखाद्या स्त्रीला गरोदरपणात मात्र वेगळी वागणूक मिळते... गरोदर असल्यामुळे स्त्रियांना नोकरीत, कामांत मिळणारी सूट... सुट्य्या... यांवर अनेक जण आक्षेप घेताना दिसतात. यामुळेच तिला अनेकदा नोकऱ्यांत प्रमोशन आणि नव्या, आव्हानात्मक जबाबदाऱ्याही नाकारण्यात येतात. 

अशाच एका महिलेच्या भूमिकेत सध्या राधिका शिरलीय... पहा, या परिस्थितीला आणि आपल्याला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीला 'ती' कशी तोंड देतेय... 

व्हिडिओ पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.