मुंबई : बाल अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवलेली श्वेता बसू हिने मीडियावर वेश्वावृत्ती प्रकरणात चुकीच्या पद्धतीने नाव गोवले गेल्याबद्दल आरोप लावला आहे.
वेश्यावृत्ती रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर श्वेताने ५९ दिवसांसाठी सुधारगृहात पाठविण्यात आले होते. श्वेतावर या रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पाच डिसेंबरला हैदराबादच्या नामपल्ली मट्रोपॉलिटन सत्र न्यायालयाने या प्रकरणात श्वेताला 'क्लीन चीट' दिली आहे. न्यायालयाने श्वेता विरोधातील सर्व आरोप मागे घेतले आणि खालच्या न्यायालयात तिच्या विरोधात देण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती दिली.
आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकलेल्या एका ओपन लेटरमध्ये २३ वर्षीय या अभिनेत्रीने लिहिले की, प्रेसमध्ये ज्या पद्धतीने हे प्रकरण मांडण्यात आले. त्याने मी खूप दुःखी आहे. या सर्व प्रकरणाला विसरून मी पुढे जाऊ इच्छीते असेही तिने यात म्हटले आहे. 'मकडी' चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.