कोण होते ते बिझनेसमन?, श्वेताच्या आईचा प्रश्न

बालअभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेत्री श्वेता प्रसाद हिला देहविक्री प्रकरणी अटक झाल्यानंतर बॉलिवूडमधली अनेक मंडळी मूग गिळून गप्प बसलेत. पण, श्वेताची ऑनस्क्रीन 'आई' बनलेल्या साक्षी तन्वरनं मात्र या प्रकरणाबद्दल जाहीर वाच्यता केलीय.  

Updated: Sep 10, 2014, 12:30 PM IST
कोण होते ते बिझनेसमन?, श्वेताच्या आईचा प्रश्न  title=

मुंबई : बालअभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेत्री श्वेता प्रसाद हिला देहविक्री प्रकरणी अटक झाल्यानंतर बॉलिवूडमधली अनेक मंडळी मूग गिळून गप्प बसलेत. पण, श्वेताची ऑनस्क्रीन 'आई' बनलेल्या साक्षी तन्वरनं मात्र या प्रकरणाबद्दल जाहीर वाच्यता केलीय.  

एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या कार्यक्रमात श्वेताच्या आईची भूमिका निभावणाऱ्या साक्षीनं श्वेताची बाजू घेतलीय. साक्षीनं आपल्या ऑनस्क्रीन मुलीला एक जाहीर पत्रही लिहिलंय. 

श्वेताच्या ऑनस्क्रीन आईचं पत्र.... 
'माझी ऑनस्क्रीन मुलगी...' असं श्वेताला उद्देशून साक्षी म्हणते, जवळपास 14 वर्षांपूर्वी मी एका टीव्ही शोसाठी शूटींग सुरू केलं होतं. काही एपिसोडनंतर माझ्या मुलीची भूमिका निभावणाऱ्या मुलीच्या जागी 9 वर्षांच्या एक नवीन मुलगी आली. जी खूप गोड आणि प्रतिभावान होती. ही भूमिका जणू काही तिच्यासाठीच लिहिली होती अशा पद्धतीनं तिनं ही भूमिका पार पाडली. आमचं हे नात गेल्या 13 वर्षांत इतकं दृढ झालं की प्रत्येक वर्षी 'मदर्स डे'निमित ती मला शुभेच्छा देतेय. मी नेहमी तिच्या अभ्यासाविषयी आणि कामाविषयी विचारत होती आणि ती नेहमी आत्मविश्वासानं उत्तर देत होती की सगळं काही ठिकठाक आहे... 


बालकलाकार श्वेता 

माझी ऑनस्क्रीन मुलगी काही चुकिच्या कारणांमुळे मीडियाची हेडलाईन बनल्यानंतर अनेकांचे मला फोन आले... की तू तिच्याविषयी वाचलंस का? तर माझं उत्तर आहे... हो मी श्वेताबद्दल वाचलंय... कारण यामध्ये केवळ तिच्याचविषयी लिहिलं गेलंय. जर मीडियानं तिच्या तथाकथित हाय प्रोफाइल बिझनेसमन क्लाइंटसबद्दल लिहिलं असतं तर मी त्यांच्याविषयीही वाचलं असतं... प्रामाणिकपणे सांगायचं तर मी खूप निराश आहे की मीडियानं त्या लोकांची ओळख लपवून ठेवलीय. मला त्यांची नावं जाणून घेण्यात कोणताही रस नाही... पण, त्यांची नावं समोर आली असती तर मला चांगलं वाटलं असतं. त्यामुळे त्यांचं कुटुंब, आई, मुलगी, बहिण, पत्नी आणि मित्र-मैत्रिणींनाही त्यांच्या या कारनाम्याचा पत्ता लागला असता. 

श्वेतानं आपल्या जबानीत सगळं काही स्वीकार केलंय. कमीत कमी तिच्यात एव्हढी तरी हिंमत आहे की या सगळ्याची कबुली देऊन ती स्वीकार करतेय... (जसं बातम्यांत सांगितलं जातंय).

हे सगळं समजल्यानंतर मला तिची भेट घ्यायची होती, तिच्याशी बोलायचं होतं... पण, तिची भेट झाली नाही... तेव्हा मी तिच्या खऱ्या आईशी बोलले... आपल्यापैंकी किती जणांना माहित आहे की तिच्या आईलादेखील अजूनपर्यंत परवानगी दिली गेलेली नाही? आपल्यापैंकी किती जणांना माहीत आहे की जजनं तिच्या आईला ती रिमांड होममध्ये स्त्रिया आणि मुलांशी संगीत आणि जीवनाबद्दल बोलतेय असं सांगितलंय? तिची आई कोसळून गेलीय. तिच्याकडे काही प्रश्नही आहे... माझ्या मुलीचा कोणताही अपराध नाही, तिचं नाव यापद्धतीनं का बदनाम केलं जातंय? या पद्धतीच्या बेजबाबदार रिपोर्टींगमुळे तिच्या जिवनावर कधीही न निघणारा डाग लागला जाईल, तेव्हा काय होईल? देव ना करो, पण उद्या तिला हे सगळं सहन झालं नाही आणि तिनं एखादं घातक पाऊल उचललं तर?


'मकडी' सिनेमासाठी बालकलाकार श्वेताला राष्ट्रीय पुरस्कार

कुणाकडे उत्तर आहे?
तिची आई आणि माझ्यासोबतच अनेक स्त्रियांना आणखी काही प्रश्नांची उत्तरं हवीत. मीडियाचा एक मोठा वर्ग केवळ मुलींचीच नावं का उघड करतात? त्या मुलीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी त्या बिझनेसमनची नावं आणि फोटो का छापले जात नाहीत? त्यांची प्रायव्हसी जपली जाते, आणि मुलीची नाही? केवळ यासाठीच की ती एक सॉफ्ट टार्गेट आहे, एक अभिनेत्री आणि पब्लिक फिगर आहे? आमचे मॉरल पोलीस यावर का गप्प आहेत? असा देश, जिथं रेपिस्ट आणि हत्यांऱ्यांना प्रायव्हसीचा अधिकार दिला जातो... तिथं त्या मुलीच्या अधिकारांना का पायदळी तुडवलं जातं? तिच्याबद्दल हा बेजबाबदार आणि असंवेदनशील व्यवहार कशासाठी? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.