मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे. तिनं 'लाइफ ओके' या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'अजीब दास्तां है ये' या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येतंय.
हा कार्यक्रम विवाह बाह्य संबंधावर आधारित असलेली ही गोष्ट आहे. या कार्यक्रमातून ती पहिल्यांदा छोट्यापडद्यावर अभिनय करणार आहे. याआधी सोनालीने अनेक रिअॅलिटी शोमध्ये जजची भूमिका केली आहे.
'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमातून सर्वाची लाडकी सून झालेली अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील आतापर्यंतची महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमासाठी ९० हजार ते एक लाख १५ हजारपर्यंत ती एपिसोडसाठी मानधन घेत होती.
१९९४साली 'आग' या चित्रपटातून सोनालीची कारकीर्द सुरू झाली होती. त्यानंतर रक्षक, दिलजले, भाई, मेजरसाब आणि जख्मसारखे अनेक चित्रपट तिने गाजवले. जवळपास १४ वर्षानंतर गेल्यावर्षी आलेला 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दुबारा' या चित्रपटातून तिनं कम बॅक केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.