मुंबई: बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता आला आहे. प्रत्युषाचा मृत्यू गुदमरून झाला असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर अनेकतर्कवितर्क लावले जात आहेत. तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्याशी झालेल्या भांडणानंतर तिने मृत्यूला कवटाळल्याचे तर्क काहींनी लावले.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राहुल राज सिंग याला बांगुर नगर पोलीस स्टेशनला नेलं आहे.