मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी आली आणि त्या क्षणापासून तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तो फरार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. मात्र राहुलने मुंबई पोलिसांकडे आपला जवाब नोंदवला असल्याची बातमी आता मिळत आहे.
Actress Pratyusha Banerjee's friend Rahul Raj Singh reaches Siddharth Hospital in Mumbai pic.twitter.com/RkgdPlSrBp
— ANI (@ANI_news) 2 April 2016
'मी आणि प्रत्युषा एकाच २ बेडरुम्सच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. आमच्याकडे दोन चाव्या होत्या; एक तिच्याकडे होती, तर दुसरी माझ्याकडे. मी जेव्हा बेडरुममध्ये प्रवेश केला तेव्हा ती छताला लटकत होती. मी खूप घाबरलो. मी लगेच शेजाऱ्यांना बोलवलं. त्यांच्याच मदतीने मी प्रत्युषाला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेलं. आम्हाला वाटलं ती जिवंत आहे, पण तसं नव्हतं. मला खूप भीती वाटली की मी पोलिसांना बोलावलं नाही. हॉस्पिटलने पोलिसांना माहिती दिली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर मी तिच्या कुटुंबीयांना आणि आमच्या काही जवळच्या मित्रांना फोन केला,' असं राहुल त्याच्या जवाबात म्हणाला आहे.
प्रत्युषाच्या आत्महत्येवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तिच्या प्रेमजीवनात आलेल्या अपयशामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा काही जणांनी केला आहे. तर तिचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.