सुल्तानने ५ दिवसातच तोडले कमाईचे रेकॉर्ड

सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमान सुल्तान कामगिरी केली आहे. बॉक्स ऑफिसवर जबगदस्त कमाई सुरुच आहे. जगभरात रिलीज झालेल्या सुल्तानने पहिल्या 5 दिवसात ३०० कोटींची कमाई केली आहे.

Updated: Jul 12, 2016, 02:24 PM IST
सुल्तानने ५ दिवसातच तोडले कमाईचे रेकॉर्ड title=

मुंबई : सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमान सुल्तान कामगिरी केली आहे. बॉक्स ऑफिसवर जबगदस्त कमाई सुरुच आहे. जगभरात रिलीज झालेल्या सुल्तानने पहिल्या 5 दिवसात ३०० कोटींची कमाई केली आहे.

७ जुलैला रिलीज झालेल्या या सिनेमाने भारतात 252.5 कोटी आणि विदेशात 92 कोटीची कमाई केली आहे. एकूण या सिनेमाने 344.5 कोटीची कमाई केली आहे.

'सुल्तान' पहिल्या आठवड्यात सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड 'बजरंगी' भाईजानच्या नावावर होता. ज्याने 103 कोटींची कमाई केली होती.

सलमान खानने लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.