...तर मी येथे राहिले नसते

बॉलीवूड अभिनेता आमिर खान तसेच शाहरुखने केलेल्या असहिष्णुतेच्या विधानावरुन देशात चांगलाच गदारोळ गाजला. या विधानावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली. अनेकांनी तीव्र प्रतिक्रियाही दिल्या.

Updated: Dec 6, 2015, 04:35 PM IST
...तर मी येथे राहिले नसते title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान तसेच शाहरुखने केलेल्या असहिष्णुतेच्या विधानावरुन देशात चांगलाच गदारोळ गाजला. या विधानावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली. अनेकांनी तीव्र प्रतिक्रियाही दिल्या.

या मुद्दयावर आता अभिनेत्री सनी लिओननेही तोंड उघडले आहे. भारत असहिष्णु नाही असे सनीने म्हटलेय. भारतात असहिष्णुता असती तर मी आज येथे नसते, असेही सनीने सांगितले. माझे देशावर प्रेम आहे आणि राहण्यासाठी हे सगळ्यात चांगले ठिकाण आहे. मला सुरक्षित वाटत नसते तर मी येथे राहिलेच नसतेही असेही पुढे ती म्हणाली. 

पॉर्न इंडस्ट्रीनंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी सनी कॅनडा येथे राहत होती. गेल्या काही वर्षांपासून ती भारतात राहत आहे. बॉलीवूडमध्येही तिने आपले चांगले बस्तान बसवलेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.