50 व्या बर्थडेला सलमानच्या जीवनाचे सत्य येणार समोर

बिईंग सलमान हे सलमान खानच्या जीवनावर आधारीत पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. लेखक जासिम खान यांनी सलमानच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

Updated: Dec 5, 2015, 08:00 PM IST
50 व्या बर्थडेला सलमानच्या जीवनाचे सत्य येणार समोर title=

मुंबई  : बिईंग सलमान हे सलमान खानच्या जीवनावर आधारीत पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. लेखक जासिम खान यांनी सलमानच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

अनेक वाद -विवादांमध्ये अडकलेला सलमान खानच्या जीवनावर या पुस्तकात नेमकं काय लिहिलं गेलं आहे याबाबत अनेकांना उत्सूकता असेल.

हिट अँड रन प्रकरणात सलमानला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानच्या अनेक चाहत्यांनी एकच जल्लोष केला पण ज्या गरिबाचा त्यात मृत्यू झाला त्याची कोणालाच आठवण नव्हती. 

काळवीट शिकार प्रकरण, हिट अँड रन प्रकरण अशा अनेक वाद-विवादात अडकेल्या सलमानच्या अशाच अनेक गोष्टींवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.  तसेच त्याचे इतर माहित नसलेले अनेक गोष्टीही पुस्तकाच्या माध्यमातून जासिम खान यांनी वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.