मुंबई : सैराटमधील परश्या साकारणाऱ्या आकाशच्या भूमिकेला तोडीस तोड लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे गावचा रहिवासी आहे.
सैराट रिलीज झाल्यानंतर जवळ-जवळ दोन महिने प्रमोशन चाललं पण आता ते आटोपलंय, सैराटमध्ये भूमिका साकारणाऱ्या रिंकूची शाळा उघडलीय, तर तानाजी, अरबाजचं पुन्हा कॉलेजा सुरू झालं आहे.
तानाजी बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. 'सैराट'मधील लंगड्या म्हणजेच तानाजी बेंबळे गावातील विमलेश्वर विद्यालयात शिकला आहे.
तानाजीचे बारावीपर्यंतचे शिक्षण येथे झाले आहे. त्यानंतर त्याने गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंभूर्णीच्या विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.ए. च्या पहिल्या वर्षीची परीक्षा उत्तीर्ण करून तानाजी आता दुसऱ्या वर्षात पोहोचला आहे.
कॉलेजमधून परतल्यानंतर तानाजीने बेंबळे गावातील प्राथमिक शाळेला भेट दिली. तेथेही शाळा प्रशासनाने या माजी विद्यार्थी तानाजीचा सत्कार केला.
तानाजीने आपल्या मंगळवारी विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयात हजेरी लावली. कॉलेजमध्ये शिक्षक आणि अन्य स्टाफने तानाजीचा सत्कार केला. कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने अजून शिकविण्यास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे तानाजीही लगेच मागे परतला.