तनु वेडस् मनु रिटर्न्स : कंगनाचा आणखीन एक लाजवाब परफॉर्मन्स!

 आनंद राय दिग्दर्शित 'तनु वेड्स मनु' ही कहीणी आहे तनु, मनु आणि कुसुमची... कुसुम ही तनूसारखीच दिसतेय... तनु आणि मनु या दोघांच्या लग्नाला चार वर्ष झालेली असतात.. पण... 

Updated: May 22, 2015, 02:23 PM IST
तनु वेडस् मनु रिटर्न्स : कंगनाचा आणखीन एक लाजवाब परफॉर्मन्स! title=

सिनेमा : तनु वेडस् मनु रिटर्न्स
दिग्दर्शक : आनंद राय 
लेखक : हिमांशू शर्मा
कलाकार : कंगना रानौत, आर. माधवन
वेळ : २ तास

मुंबई :  आनंद राय दिग्दर्शित 'तनु वेड्स मनु' ही कहीणी आहे तनु, मनु आणि कुसुमची... कुसुम ही तनूसारखीच दिसतेय... तनु आणि मनु या दोघांच्या लग्नाला चार वर्ष झालेली असतात.. पण या दोघांमध्ये आता आधीसारखं ट्युनिंग राहिलेलं नसते. तनु आपल्या या बोरींग संसाराला वयतागून मनुला सोडुन निघुन जाते.. तिथे दुसरीकडे मनुची ओळख अगदी हुबेहुब तनु सारख्या दिसणाऱ्या एका मुलीशी होते.. या मुलीचं नाव कुसुम... मग काय... मनु कुसुमच्या प्रेमात पडतो... आणि या नंतर जी गंमत घडते त्यासाठी सिनेमाच्या दिग्दर्शकाला हॅटस् ऑफ... 

अभिनय
अभिनेत्री कंगणा रनौतनं पुन्हा एकदा तिच्यातल्या हिरोईनला चॅलेंज केलंय. खरं तर सिनेमा पाहताना कंगणाला टफ देणारी कुणी अभिनेत्री असेल तर ती स्वत: कंगणाच आहे हे जाणवतं. कंगणा यात डबल रोलमध्ये दिसतेय आणि हे दोन्ही रोल्स तिनं तितक्याच ताकदीनं हाताळलेत.

या सिनेमात अनेक पात्र आहेत पण फिल्म पाहताना कंगणावरुन नजर हटतच नाही. तिचा अभिनय लाजवाब झालाय. तिनं पुन्हा एकदा स्वत:साठीच एक बेंचमार्क सेट केलाय. 

आर माधवननंदेखील यात छान काम केलंय पण त्याला कंगणासारख्या तगड्या अभिनेत्रीचा सामना करावा लागलाय. याचबरोबर अभिनेत्री स्वरा भास्करचा परफॉर्मन्सही छान झालाय. 

संवाद
या सिनेमाचा आणखी एक प्लस पोइंट म्हणजे यातले संवाद... कलाकारांचा ब्रिलीयंट अभिनय आणि त्याला अप्रतीम संवादाची जोड म्हणजे सोने पे सुहागाच... केवळ चांगले संवाद असून चालत नाही तर त्याची डायलॉग डिलीव्हरीही त्याच पद्धतीनं डिलिव्हर करण्यात आलीय. 

सिनेमाच्या दुसऱ्या भागात काही ठिकाणी काही उणीवा जाणवतात. बनो तेरा स्वेटर हे गाणं जरी फूट टॅपिंग वाटत असेल तरी इंटरवलनंतर सिनेमात अनेक अशी गाणी आहेत ज्य़ांची खरंतर गरजंच भासत नाही. ज्यामुळे सिनेमा थोडासा बोअरींग वाटतो. हे सगळं जरी असलं तरी सिनेमा एंटरटेनिंग आहे आणि विशेषकरून कंगणाचा परफॉर्मन्स मस्तच झालाय.

या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही देतोय या सिनेमाला देतेय ३.५ स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.