मुंबई : बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानच्या डाव्या गुडघ्यावर गुरूवारी शस्त्रक्रिया पार पडलीय. ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
शाहरूखच्या गुडघ्यावरील ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. शाहरुखला गुडघ्याची सूज आणि वेदना यांचा त्रास होत होता. यावर उपचार म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर संजय देसाई यांनी दिली.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या १९ वर्षांत शाहरुख खानला तब्बल १२ शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलंय.
१९९६ मध्ये आतड्यांना इजा झाल्याने शाहरुखला शस्त्रक्रिया करावी लागली होती. १९९७ मध्ये त्याच्या गुडघ्याला इजा झाली होती. १९९८ मध्ये त्याच्या उजव्या पायाचा पंजा जखमी झाला होता, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २००१ मध्ये उजव्या पायाचा घोट्याला इजा झाली होती, त्यानंतर २००३ मध्ये पाठीची शस्त्रक्रिया करावी लागली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.