वाचन आणि लिखाण करणे हेच पहिलं प्रेम - गुलजार

वाचन आणि लिखाण करणं हेच आपलं पहिलं प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी दिली.

Updated: Jan 12, 2017, 10:34 PM IST
वाचन आणि लिखाण करणे हेच पहिलं प्रेम - गुलजार title=

मुंबई : वाचन आणि लिखाण करणं हेच आपलं पहिलं प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी दिली.

लिहायला वेळ मिळावा आणि पुस्तकांशी मैत्री वाढवावी, म्हणूनच आपण चित्रपट करणे बंद केले आहे, गुलजार म्हणालेत.

झी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०१७ पिंक सिटीमध्ये येत्या १९ ते २३ जानेवारीला आयोजित करण्यात येतोय, त्यानिमित्ताने गुलजार यांच्याशी गीतकार स्वानंद किरकिरे यांनी संवाद साधला. 

या फेस्टिव्हलची एक अनोखी नजाकत तुम्हाला पाहायला मिळेल असं म्हणत गुलजार यांनी सर्व साहित्यप्रेमींनी आवर्जुन हजेरी लावावी असे आवाहनही केले आहे.