अजय देवगण करणार टायगर श्रॉफसोबत सिनेमा

अजय देवगणनं जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला घेऊन सिनेमा करण्याचा विचार करत आहे. टायगर श्रॉफनं 'हिरोपंती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Updated: Sep 24, 2014, 11:51 AM IST
अजय देवगण करणार टायगर श्रॉफसोबत सिनेमा title=
मुंबई : अजय देवगणनं जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला घेऊन सिनेमा करण्याचा विचार करत आहे. टायगर श्रॉफनं 'हिरोपंती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
 
या सिनेमातून  टायगरचा डान्स आणि अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यानंतर टायगरला खूप चांगल्या सिनेमाच्या ऑफर सुद्धा आले आहेत.
 
अजय देवगणनं या आधी सुद्धा टायगरला एक सिनेमात घेण्याचं प्लानिंग केले होते. पण, त्या सिनेमात दोन हिरो असल्यामुळे त्यानं यात काम करण्यास नकार दिला होता. 
आता पुन्हा एकदा अजय टायगरला घेऊन सिनेमा करण्याच्या तयारीत आहे.  रेमो डिसूझा हा त्या सिनेमाचा दिग्दर्शक असणार आहे.
 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.