व्हिडिओ : 'मॅसेंजर ऑफ गॉड'वर बंदी आणण्याची मागणी

डेरा सच्चा सौदा या संस्थेचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा सिनेमा 'मॅसेंजर ऑफ गॉड' (एमएसजी) सुरुवातीपासूनच वादात अडकलाय... त्यामुळेच की काय या वादग्रस्त सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय.  

Updated: Dec 27, 2014, 02:36 PM IST
व्हिडिओ : 'मॅसेंजर ऑफ गॉड'वर बंदी आणण्याची मागणी title=

मुंबई : डेरा सच्चा सौदा या संस्थेचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा सिनेमा 'मॅसेंजर ऑफ गॉड' (एमएसजी) सुरुवातीपासूनच वादात अडकलाय... त्यामुळेच की काय या वादग्रस्त सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय.  

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. आत्तापर्यंत हा व्हिडिओ १५,८६,५३२ वेळा पाहण्यात आलाय. ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशन आणि अकाल तख्त साहिबचे ज्ञानी गुरबचन सिंह यांनी सरकारकडे या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केलीय. अनेकदा गुन्हेगारी तक्रारींचा सामना करणारा डेरा सच्चा सौदाचा राम रहीम बाबा लोकांना गंडवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

'मॅसेंजर ऑफ गॉड' हा सिनेमा १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
व्हिडिओ पाहा -
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.