अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये ट्विट युदध

कमाल राशिद खान हा चर्चेत राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. सोशल मीडियातून ही केआरके हा अनेकांविरोधात वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये असंच एक ट्विटर युद्ध रंगलं आहे.

Updated: Feb 27, 2016, 11:01 PM IST
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये ट्विट युदध title=

मुंबई : कमाल राशिद खान हा चर्चेत राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. सोशल मीडियातून ही केआरके हा अनेकांविरोधात वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये असंच एक ट्विटर युद्ध रंगलं आहे.

केआरके याने अभिनेत्री आलिया भटविरोधात एक ट्वीट केलं ज्यामुळे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा चांगलाच भडकला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलियाने व्होग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं ज्यामध्ये आलिया बिकनीमध्ये दिसत आहे. त्यावर केआरकेने या मॅगझिनच्या कव्हर फोटो रिट्वीट करत लिहिलं की, 'Alia looks so Bacchi in panty but still some people keep forcing her to wear it.'

केआरकेच्या या कमेंटवर सिद्धार्थ संतापला आणि त्याने केआरकेला उलट ट्वीट केलं. त्यावर पुन्हा केआरकेने ट्विट केलं की 'सिद्धार्थ, तुला भारतातील 130 कोटी लोकं सांगतायेत की तू अभिनय बंद कर. तरीही अभिनय करुन त्यांचा जाच करतो आहेस.”

मग सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, 'केआरके, तुम्हाला माझा आधीचा ट्वीट कळला नाही बहुतेक. तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. इंग्रजी क्लासेसची गरज आहे.'

यावर पुन्हा केआरके म्हणाला, लवकरच तुझ्याकडे इंग्रजी शिकायला येईन. तू दिल्लीतील आयडिया इन्स्टिट्युटमध्ये शिकला आहेस ना.' अशा प्रकारे दोघांमध्ये चांगलंच ट्विटर युद्ध रंगलं.