बिग बींना गिफ्ट म्हणून मिळाली बॅट

बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरामध्ये आहेत. हे असंख्य चाहते बिग बींना नेहमीच आगळं-वेगळं गिफ्ट देत असतात.

Updated: Feb 27, 2016, 10:33 AM IST
बिग बींना गिफ्ट म्हणून मिळाली बॅट title=

मुंबई: बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरामध्ये आहेत. हे असंख्य चाहते बिग बींना नेहमीच आगळं-वेगळं गिफ्ट देत असतात. परदेशातल्या बिग बींच्या अशाच एका चाहत्यानं अमिताभ बच्चन यांना एक बॅट गिफ्ट दिली आहे. 

ही बॅट देणारा त्यांचा चाहता आहे, बॉलर्सचा कर्दनकाळ असलेला वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन ख्रिस गेल. अमिताभ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला गिफ्ट म्हणून बॅट दिल्याचा मला अभिमान आहे. मी त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या स्टाईलचा फॅन आहे, असं गेल म्हणालाय.

 तर गेलनं दिलेली मला गिफ्ट दिलेली बॅट हा माझा सन्मान आहे. गेल मला ओळखतो हे मला माहिती नव्हतं. मी ही त्याचा मोठा फॅन आहे अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली आहे.