व्हिडिओ : बाहुबलीच्या 'बूल फाईट'चा सस्पेन्स संपला...पाहा!

२०१५ साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या बाहुबली या सिनेमानं यशाचा एक नवा उच्चांक गाठला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. समीक्षकांनीदेखील या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतलं. 

Updated: Jan 7, 2016, 01:05 PM IST
व्हिडिओ : बाहुबलीच्या 'बूल फाईट'चा सस्पेन्स संपला...पाहा!

नवी दिल्ली : २०१५ साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या बाहुबली या सिनेमानं यशाचा एक नवा उच्चांक गाठला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. समीक्षकांनीदेखील या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतलं. 

तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर याच सिनेमातील बूल फाईटिंगचं दृश्यं आजही तुमच्या डोळ्यासमोर असेल... भल्लालदेव एका भल्यामोठ्या वळूसोबत फाइटिंग करतानाचं हे दृश्य आहे. 

हे दृश्यं खरोखरच प्रेक्षकांना अचंभित करणारं दृश्यं ठरलं होतं. सिनेमात हे दृश्यं कसं काय चित्रीत करण्यात आलं असेल बरं? हा प्रश्न त्यांना खायला उठला होता. याच प्रश्नाचं उत्तर हा व्हिडिओ देतोय...