पाहा ट्रेलर: राणी मुखर्जीची 'मर्दानी'!

Updated: Jun 24, 2014, 07:42 PM IST
पाहा ट्रेलर: राणी मुखर्जीची 'मर्दानी'! title=

 मुंबईः राणी मुखर्जीची फिल्म 'मर्दानी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट राणी मुखर्जीच्या लग्नानंतरचा कमबॅक चित्रपट असेल. ज्यात ती पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा निर्माता राणीचा नवरा आदित्य चोप्रा तर प्रदीप सरकार दिग्दर्शक आहे. येत्या 22 ऑगस्ट फिल्म रिलीज होणार आहे. 

या फिल्ममध्ये राणी एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे, जी मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम करत असते. त्यात ती संकटांना घाबरत ना अडचणींना भीत असते. सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यत जाणं तिचं वैशिष्ट्य आहे. राणीचा यांत थोडा हटके लुक दाखविला आहे त्यामुळं आता राणीचे चाहते हा लुक पाहण्यासाठी उत्सुक असतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.