बिकनी घालणे हे वाईट नाही - बिपाशा बसू

अभिनेत्री बिपाशा बसू हिने सिनेमात काम करण्यासाठी मला बिकनी घालायला कोणतीही अडचण नाही. बिकनी घालणे हे वाईट नाही, असं मत तिने म्हटलंय.

Updated: Aug 19, 2014, 04:32 PM IST
बिकनी घालणे हे वाईट नाही - बिपाशा बसू title=

मुंबई : अभिनेत्री बिपाशा बसू हिने सिनेमात काम करण्यासाठी मला बिकनी घालायला कोणतीही अडचण नाही. बिकनी घालणे हे वाईट नाही, असं मत तिने म्हटलंय.

बिपाशाने एक मुलाखत दिली त्यावेळी बिकनीबाबत भाष्य केलं. माझ्यासाठी बिकनी घालणे कोणतीही मोठी घटना नाही. तुम्ही जर अगदी फिट असाल तर तुम्हाला बिकनी चांगली दिसेल. जर एकादा सिनेमा भडक असेल तर बिकनी आपले ग्लॅमर अधिक वाढवेल, असे बिपाशाने म्हटलंय. बिपाशाने 'धूम 2' आणि 'प्लेअर्स' या सिनेमात बिकनी घातली होती.

बिकनी ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. ज्यावेळी मी पहिल्यांदा बिकनी वापली त्यावेळी माझे हात-पाय उठून दिसलेत. 'धूम 2'च्यावेळी मी एकदम फिट होते. बिकनीबाबत मी जास्त काही विचार करत नाही. बिपाशाचे आगामी 'क्रिचर 3डी' या सिनेमाच्या रिलीजकडे लक्ष आहे. विक्रम भट्ट निर्देशित हा सिनेमा आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात रिलज होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.