'मोदींची वाहवा करण्यापलिकडे अनुपम खेर यांनी केलंच काय?'

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी यंदाच्या पद्म पुरस्कारावर आणि अभिनेते अनुपन खेर यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलंय.

Updated: Jan 30, 2016, 03:59 PM IST
'मोदींची वाहवा करण्यापलिकडे अनुपम खेर यांनी केलंच काय?' title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी यंदाच्या पद्म पुरस्कारावर आणि अभिनेते अनुपन खेर यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलंय.

अनुपम खेर यांना यंदाचा पद्मश्री देण्यावरून कादर खान नाराज दिसले. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा आणि वाहवा करण्याशिवाय अनुपम खेर यांनी काय केलंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारनं त्यांना पुरस्कार द्यावा याच्यावर काही आक्षेप नाही... पण, मला हे माहीत आहे की हा अवॉर्ड मिळवण्यासाठी कोणते मापदंड आहेत, ज्यांची माझ्याकडे कमतरता आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 

ही यादी पाहिल्यानंतर... या यादीत ज्यांची नावं आहेत ती नावं पाहून बरंच झालं मला हा अवॉर्ड मिळाला नाही, असं वाटल्याची प्रतिक्रिया कादर खान यांनी व्यक्त केलीय. ज्या लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांचा मी आभारी आहे असंही त्यांनी म्हटलंय. 

बरंच झालं त्यांनी मला पद्मश्री दिला नाही. मी कधीही कुणाची चापलुसी केली नाही... ना कधी करणार... मला या पद्धतीनं अवॉर्ड नकोत... असं ७९ वर्षीय कादर खान यांनी म्हटलंय. 

बॉलिवूडमधून यंदाच्या पद्म अवॉर्डस विजेत्यांमध्ये रजनीकांत, अनुपम खेर, मधुर भांडारकर, प्रियांका चोपडा, अजय देवगन, उदित नारायण यांच्या नावाचा समावेश आहे.