जेव्हा रिक्षा ड्रायव्हर 'सुपरहिरो'ला ओळखतही नाही...

बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशनवर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली... आणि गंमत म्हणजे ज्या रिक्षानं त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला हा एक बॉलिवूड स्टार आहे, याची भनकही लागली नाही.

Updated: Sep 23, 2014, 01:09 PM IST
जेव्हा रिक्षा ड्रायव्हर 'सुपरहिरो'ला ओळखतही नाही... title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशनवर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली... आणि गंमत म्हणजे ज्या रिक्षानं त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला हा एक बॉलिवूड स्टार आहे, याची भनकही लागली नाही.

हिंदी सिनेमांत सुपर स्टारडम पाहिल्यानंतर ह्रतिक रोशननं ही कधी कल्पनाही केली नसेल. ह्रतिकचा सुपरडान्स, त्याची रेखीव बॉडी, ‘कृष’ बनल्यानंतर इंडियन सुपर हिरोची इमेज आणि सुपर डुपर हिट सिनेमे... ही सगळी कमाई असूनही काही सामान्य लोकांपर्यंत तो अजूनही पोहचलेला नाही. काही जण त्याला ओळखतही नाहीत. हे माहीत पडल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसलाय. 

नुकतंच याचा प्रत्यय आला. त्याचं झालं असं की, रात्री घरी परतत असताना ह्रतिकची गाडी रस्त्यातच बंद पडली. अशात त्याला घरी पोहचण्यासाठी रिक्षा पकडावी लागली.

पण, त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ज्या रिक्षातून त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरनं त्याला ओळखलंदेखील नाही. याबद्दल दुसरं तिसरं कुणी नाही तर ह्रतिकनंच माहिती दिलीय. सोशल वेबसाईट ट्विटरवरून त्यानं ही माहिती दिलीय. 

पाहा, काय म्हटलंय ह्रतिकनं ट्विटरवर...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.