सैराट सिनेमाची कॉपी कुणी लिक केली?

सैराट सिनेमाची कॉपी कुणी लिक केली हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे, कारण सैराटवरील बहुतेक व्हिडीओंवर सेन्सॉर कॉपी असल्याचं लिहिलं आहे.

Updated: May 10, 2016, 11:09 PM IST
सैराट सिनेमाची कॉपी कुणी लिक केली? title=

मुंबई : सैराट सिनेमाची कॉपी कुणी लिक केली हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे, कारण सैराटवरील बहुतेक व्हिडीओंवर सेन्सॉर कॉपी असल्याचं लिहिलं आहे.

सैराटने सेन्सारला हा व्हिडीओ पाठवला असताना, ही प्रत लिक तर झाली नाही ना असा सवाल विचारला जात आहे. 

सेन्सॉरसाठी कॉपी पाठवली असताना, हा सिनेमा लिक झाला असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. यापूर्वी मराठी सिनेमा झेंडाची प्रत लिक झाली होती, त्यावरही सेन्सॉर कॉपी असं लिहिण्यात आलं होतं.