मुंबई : सैराटच्या यशावर बॉलीवूडमधील भले-भले स्टार गपगार झालेत की काय?, असं इंग्रजी पेपरने सैराटविषयी केलेल्या बातम्यांवरून वाटू लागलंय. बॉलीवूडला सैराटच्या यशाची धडकी भरल्याचं इंग्रजी न्यूज पेपर्सनी म्हटलंय.
इंग्रजी पेपरने सैराटवर बातम्या करण्याची हिंमत दाखवली असली, तरी हिंदी न्यूज पेपरवाल्यांनी अजून सैराटची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. कारण बॉलीवूडमधील चांगल्या-चांगल्यांची मनमानी मोडीत काढण्यात सैराटचं यश कारणीभूत ठरणार असल्याचं सांगण्यात येतंय.
बाहुबली सारख्या प्रादेशिक सिनेमाने बॉलीवूडमधील व्यवसायाची गणित बदलली, तसा सैराट प्रादेशिक सिनेमा असला, तरी व्यावसायिक दृष्ट्या देखील १०० टक्के यशस्वी झाला आहे. प्रादेशिक सिनेमाच्या लाटेत, फक्त मसालाच नव्हे, खऱ्या अर्थाने दमदार स्क्रीप्टला महत्व येणार आहे, ते एक नवं आव्हान बॉलीवूडसमोर असेल.
मराठी चित्रपट सृष्टीतील काही दिग्गज बोलत नसल्याचं म्हटलं जातंय, ते तसं फारसं खरं वाटत नाही. कारण पुढच्या काळात सैराटच्या यशाचा मोठा फायदा मराठी इंडस्ट्रीला होणार आहे. सैराट नावाच्या पहेलवान मुंबईत बॉलीवूडच्या हक्काच्या थिएटरमध्ये पाय रोवताना दिसतोय.
आमीर खान, अनुराग कश्यप, रितेश देशमुख, सुभाष घई, नवाजुद्दीन सिद्धिकी, इरफान खान, सुजित सिरकर, स्वरा भास्कर, तुषार कपूर, रितिका सिंग यांनी सैराटचं कौतुक केलं आहे, मात्र अजूनही काही दिग्गज स्टार्स सैराटविषयी काहीही बोलण्यास पुढे आलेले नाहीत.
सैराट प्रादेशिक सिनेमा आहे, तरीही बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱ्यांची, नव्या दिग्दर्शकाची चर्चा आहे.
सैराटमध्ये नवे चेहरे लोकांनी डोक्यावर घेतलंय, त्यामुळे स्टार्सनी उगाचच धडकी घेतलीय.
नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा ट्रेन्ड बॉलीवूडमध्ये आला तर... आपल्या स्टारपणचं काय होणार स्टार्ससाठी चिंतेचा विषय आहे.
सुरूवातीला कमी थिएटरात रिलीज झालेला सैराट अजूनही बधत नाहीय...
प्रादेशिक सिनेमाची इंडस्ट्री मुंबापुरीत मजबूत स्थित आली, तर एक चांगली स्पर्धा रंगेल, पण स्टारपणाच्या नावाने वर्षानुवर्षे उभ्या ठाकलेल्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.