मुंबई: एखादी फिल्म नाकारणं, बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. पण, यावेळी करीना कपूरनं पाच महिन्यात चक्क सहा फिल्म्स नाकारल्यात.
"I DONT WANT TO DO ANYTHING THAT'S NOT GREAT.. ", असं करीनाचं म्हणणं आहे... तोच आशय, तेच तेच विषय, आणि MEANING LESS सिनेमा करण्यापेक्षा मी घरी बसून पुस्तकं वाचणं पसंत करेन असं करीना म्हणतेय.
पण करीनाच्या या ब्रेक मागे कारण काही वेगळंच असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतोय. करीनानं लग्नानंतर माझ्या प्रायोरिटीज बदलल्या असं म्हटलंय. बहूतेक नवाब खानच्या घरी नवा पाहूणा येणार की काय, अशी शंका येतेय. कारण पाच महिन्यात सहा सिनेमे नाकारत करीनाचा हा ब्रेक नक्की कशासाठी आहे हा येणारा काळच सांगले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.