सुझानमुळे अर्जुनच्या पत्नीनं रडत सोडली पार्टी?

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खान यांनी घेतलेल्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर या जोडप्यामध्येही काहीतरी बिनसल्याचं दिसतंय. 

Updated: Aug 8, 2014, 12:29 PM IST
सुझानमुळे अर्जुनच्या पत्नीनं रडत सोडली पार्टी? title=
फाईल फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खान यांनी घेतलेल्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर या जोडप्यामध्येही काहीतरी बिनसल्याचं दिसतंय. 

बुधवारी, डायरेक्टर अभिषेक कपूर याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित झालेल्या पार्टीत अर्जुन पत्नी मेहरसहीत उपस्थित झाला होता. दोघंही या पार्टीसाठी एकत्र दाखल झाले होते. या पार्टीमध्ये ऋतिकची पत्नी सुझानही हजर होती. 

पार्टी सुरु झाल्यानंतर काहीवेळातच मेहर अचानक पार्टीतून बाहेर निघून आली. यावेळी ती रडत असल्याचं बाहेरच उभ्या असलेल्या मीडियापासून काही लपून राहिलं नाही. 

पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अर्जुन आणि मेहर रात्री सव्वा बाराच्या दरम्यान पार्टीत दाखल झाले होते. पण, रात्री अडीचच्या दरम्यान मेहर जेव्हा एकटीच बाहेर पडली तेव्हा तिचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते. मेहेरनं जेव्हा फोटोग्राफर्सना पाहिलं तेव्हा तिनं आपला चेहरा लपवला. यावेळी ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती. त्यानंतर तीनं आपल्या ड्रायव्हरला बोलावून घेतलं आणि तिथून एकटीच निघून गेली.  

त्यानंतर 15 मिनिटांनी अर्जुनही पार्टी सोडून बाहेर आला. तो जेव्हा गाडीत बसला तेव्हा त्यानंही मीडियापासून आपला चेहरा लपवला.

सुझाननं ऋतिकला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्जुन आणि सुझानच्या संबंधांबद्दलही बरीच चर्चा झाली होती. पण, यावेळी मात्र अर्जुननं सुझान आपली चांगली मैत्रिण असल्याचं सांगत हा विषय टाळला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.