मुंबई : प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणा़त लवकरच मोठा धमाका होणार आहे. नेस वाडिया विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस फास आवळतायत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेस विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळालेत आणि लवकरच नेस विरोधात कारवाईला सुरुवात केली जाईल, असं एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय.
प्रिती झिंटा आणि नेस वाडिया वाद प्रकरणात नेस वाडिया आणखी अडचणीत सापडणार अशी चिन्हं आहेत. प्रिती आणि नेस वाडियाचा कॉमन मित्र जय कनोजियानं दिलेल्या जबाबामुळे नेसच्या अडचणी वाढल्यायत. 30 मे रोजी नेसनं प्रितीचा हात पिरगळल्याचं जयनं पोलीस जबाबात सांगितलंय. पण, या दोघांचं संभाषण मात्र आपण ऐकलं नाही, असंही जयनं म्हटलंय. जयबरोबरच आणखी पाच प्रत्यक्षदर्शींनी प्रिती आणि नेसमधला वाद जवळून पाहिलाय. तर मॅक्सवेल आणि प्रितीचा मित्र जीन लवकरच भारतात येऊन जबाब नोंदवणार आहेत.
एकाकीकडे पोलीस नेसपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे नेस आणि प्रितीचा वाद मिटावा याकरता एका ‘पॉवर’फ़ूल नेत्यानं प्रयत्न केला. तसंच एका मोठ्या वकिलाचेही हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, कुणाला़च यश येताना दिसत नाहीय. कारण प्रिती आणि नेस वाडिया दोघंही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.