नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सहीत देशातील विभिन्न भागांत समोर आलेल्या बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी बॉलिवूड वर्तुळालाही हादरा बसलाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं अशाच घटनांवर टीका केलीय.
महिला म्हणजे केवळ सेक्स किंवा मनोरंजनाच्या किंवा किचनमधली कामं करण्यासाठी नाहीत.... समाजानं आज महिलांनी बरोबरीचा दर्जा आणि सन्मान देणं गरजेचं आहे, असं प्रियांकानं म्हटलंय.
एका मुलाखतीत बोलताना, प्रियांकानं भारतासारख्या देशांत आज पुरुषांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय. मुलींनी घातलेले छोटे कपडे नव्हे तर पुरुषांची मानसिकता बलात्काराच्या घटनांसाठी जबाबदार आहेत.
दिल्लीत नुकत्याच एका कॅबमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल बोलताना प्रियांकानं, जेव्हापर्यंत पुरुषांची मानसिकता बदलत नाही तेव्हापर्यंत अशा घटना घडतच राहतील, असं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.