होय आम्ही वेगळे होतोय, मलायका-अरबाजचं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा हे दोघंही घटस्फोट घेत असल्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना अखेर त्या दोघांनीच पूर्णविराम दिलाय.

Updated: Mar 28, 2016, 09:19 AM IST
होय आम्ही वेगळे होतोय, मलायका-अरबाजचं स्पष्टीकरण title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा हे दोघंही घटस्फोट घेत असल्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना अखेर त्या दोघांनीच पूर्णविराम दिलाय.

आपण दोघेही विभक्त होत असल्याचे त्यांनी डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. खूप झाले. आम्ही आतापर्यंत वेगळे होण्यबाबात कोणतेच विधान केले नाही. मात्र आमच्या वेगळे होण्याच्या चर्चांना उत आलाय. कोणीही काहीही बोलतंय. आमच्याबाबत काहीही विधान करण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिला अशा शब्दात मलायका-अरबाज यांनी त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या अफवाबद्दल नाराजी व्यक्त केली.

हे खरं आहे की आम्ही वेगळे होत आहोत मात्र कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे नाही. आमच्या घटस्फोटाची वेगवेगळी कारणे सांगितली जातायत. मात्र त्या सर्व अफवा आहेत. आम्ही दोघेही एकमेकांच्या कुटुंबाचा आदर करतो. त्यामुळे आमच्यातील खासगी बाबीत कोणी लक्ष घालू नये. आतापर्यंतच्या ज्या काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्या केवळ निरर्थक आहेत. आम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल असं होत नाही, असेही पुढे ते दोघं म्हणाले.