युथ बॉक्स ऑफिसवर फेल

अभिनेता विक्रम गोखले, सतिश पुळेकर, नेहा महाजन स्टारर युथ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. 

Updated: Jun 5, 2016, 09:26 AM IST
युथ बॉक्स ऑफिसवर फेल title=

मुंबई : अभिनेता विक्रम गोखले, सतिश पुळेकर, नेहा महाजन स्टारर युथ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. 

युथ ही कथा आहे आजच्या युथची. ६ तरुण तरुणी पिकनीकसाठी निघालेत. या पिकनिकदरम्यान त्यांना वाटेत एक गाव लागतं. या गावात दुष्काळ असल्यामुळे लोक पाण्यासठी वणवण भटकताना दिसतात. 

या सगळ्या गोष्टी या तरुणांना अस्वस्थ करतात. मग सुरु होतो एक अनोखा लढा. अशा काहीशा पार्श्वभूमीवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमातील युवा कलाकारांच्या अभिनयाचं मात्र कौतुक होतं आहे.