मुंबई : काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.
'हाउसफुल 3'मध्ये अभिषेक बच्चनची देखील भूमिका आहे. त्यामुळे ऐश्वर्या देखील सिनेमा पाहण्यासाठी पोहोचली होती. या शोमध्ये सलमान खानचे आई-वडील आणि ऐश्वर्या सोबत होते. त्य़ा दोघांनी ही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं नाही. एका वेबसाईटच्या माहितीनुसार त्यांनी एकत्र सिनेमा पाहिला आणि खूप गप्पा देखील मारल्या.