झी 24 तासचा शानदार 'अनन्य सन्मान'

 सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. आपापल्या क्षेत्रात असीम योगदान देणा-या, मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणा-या ख-याखु-या हिरोंचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा झी 24 तासनं यंदाही कायम ठेवलीय.  2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा आज परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे.

Updated: Feb 5, 2015, 07:32 PM IST
झी 24 तासचा शानदार 'अनन्य सन्मान' title=
संग्रहीत

मुंबई : सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. आपापल्या क्षेत्रात असीम योगदान देणा-या, मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणा-या ख-याखु-या हिरोंचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा झी 24 तासनं यंदाही कायम ठेवलीय.  2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा आज परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे.

वंचित आदिवासींच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचणारे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना यंदाचा जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध सात क्षेत्रातील कर्तृत्ववान असामान्य व्यक्तिमत्त्वांना 'अनन्य सन्मान' देऊन गौरवण्यात येणार आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार नितीन सरदेसाई, ख्यातनाम क्रिकेटपटू झहीर खान, नामवंत सिने दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता शशांक केतकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.